साईराचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

। पाली/बेणसे । वार्ताहर |

सरपंच राकेश रवींद्र कांबळे आणि सारिका कांबळे यांच्या कन्येचा प्रथम वाढदिवस आणि नामकरण सोहळा तिसे (कोलाड) या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. साईरा राकेश कांबळेचा वाढदिवस सामाजिक, प्रबोधनात्मक उपक्रमानी साजरा केल्याने समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. तसेच, हा समाजाभिमुख, लोकोपयोगी वाढदिवस समाजाला प्रेरणा देणारा वाढदिवस ठरला.

यावेळी मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले, या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच, अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले. या वाढदिवसाला दिग्गज मान्यवर, कुटुंबीय, नातेवाईक यांची उपस्थिती लाभली.

Exit mobile version