| पेण | प्रतिनिधी |
पतीकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पेण तालुक्यातील राजमाची येथे घडली आहे. 14 जुलै रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास विवाहित महिला आपल्या लहान मुलीसोबत घरी असताना विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तक्रारीनुसार, लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित वागणूक दिल्यानंतर आरोपी पतीने तिला सतत मानसिक त्रास देणे, मारहाण करणे तसेच “तू मला आवडत नाहीस, तू मेलीस तरी चालेल,” अशा शब्दांत अपमानित करणे सुरू केले होते. या सततच्या छळामुळे विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रसाळ करीत आहेत.






