| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गाणी व दि प्राईड इंडिया संस्था आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यावतीने सखी जल्लोष हा कार्यक्रम शुक्रवार (दि.7) नोव्हेंबर रोजी गाणी येथे संपन्न झाला. कार्यक्रमासाठी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील कांचन जवान, ऋतुजा शिरतोडे, प्रतीक्षा कानावडे, गौरी शिंदे उपस्थित होत्या. यावेळी दामिनी पथकातील अंमलदारानी महिला विषयी समस्या जाणून घेतल्या तसेच डायल 112 व सायबर फ्रॉड बाबत माहिती दिली. यावेळी दामिनी पथकातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांना स्व सुरक्षितता, स्वसंरक्षण, महिलांची जबाबदारी, महिलांचे पुरुषांबरोबर असणारे समान स्थान यावर मार्गदर्शन केले. दि प्राइड इंडिया संस्थेचे तालुका प्रकल्प समन्वयक किशोर शितोळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गाणी ग्रमसेवक अभिजित माने, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश धाडवे, सुभाष उजळ, सुदाम शेडगे, आत्माराम रहाटवल, राज कावनकर, आर्यन येलवे व तालुक्यातील सर्व समन्वयक उपस्थित होते.







