साक्षी मिरजे उत्कृष्ट महिला अग्नीवीर म्हणून सन्मानित!

ओरिसा येथे झालेल्या पासींग परेडमध्ये जनरल बिपिन रावत रोलिंग  प्रदान!

| रायगड | प्रतिनिधी |

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कोंझर या मूळ गावातील कुमारी साक्षी मोहन मिरजे हिने नौदलातील उत्कृष्ट महिला अग्नीवीर पदक पटकावले आहे. ओरिसा येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या हस्ते महिला अग्निवीरसाठी “जनरल बिपिन रावत रोलिंग ट्रॉफी” प्रदान करण्यात आली.

साक्षी मोहन मिरजे ही महाड तालुक्यातील किल्ले रायगड च्या पायथ्याशी असणाऱ्या कोंझर येथील रहिवासी असून सध्या हे कुटुंब पुणे येथे स्थायिक झाले आहे. आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीच्या बळावर साक्षी मिरजे हि दोन महिन्यापूर्वीच अग्नीवीर म्हणून नौदलात सामील झाली होती. लहानपणापासूनच अभ्यासामध्ये पुढे असलेल्या साक्षी मिरजे हिने वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जात अग्निवीर म्हणून नौदलामध्ये  सामील झाली आहे. अग्निवीरांच्या चौथ्या तुकडीची पासिंग आऊट परेड (पीओपी) 9 ऑगस्ट रोजी आयएनएस चिल्का येथे आयोजित केली होती.  यावेळी पीओपीचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, व्हाईस ॲडमिरल व्ही श्रीनिवास, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न नेव्हल कमांड हे परेडचे संचालन अधिकारी होते. ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर हे ही यावेळी उपस्थित होते. अग्निवीरांचे 16 आठवड्यांचे नौदल प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या अग्निवीरांचा नवीन प्रवास सुरू होतो. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  गुणवंत अग्निवीरांना पदक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. विनय मारुती कदम, AVR SSR आणि संजना, AVR MR यांना अनुक्रमे चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ रोलिंग ट्रॉफी आणि सर्वोत्कृष्ट अग्निवीर SSR आणि MR साठी सुवर्णपदक मिळाले. साक्षी मोहन मिरजे, AVR SSR यांना सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीरसाठी जनरल बिपिन रावत रोलिंग ट्रॉफी प्रदान करण्यात आली आणि आशिष, NVK GD आणि युवराज, NVK DB यांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version