निवृत्तीधारकांचे वेतन थकले

स्टेट बँकेच्या श्रीवर्धन शाखेचा अजब कारभार
तीन दिवसांचा चेक वटण्यासाठी दहा दिवस

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

भारतीय स्टेट बँकेच्या श्रीवर्धन शाखेमध्ये अजब कारभार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. निवृत्त कर्मचार्‍यांना वेतनासाठी बँकेमध्ये दहा-दहा वेळा चकरा माराव्या लागत आहेत. श्रीवर्धन पंचायत समितीने काही निवृत्ती वेतनधारकांचा चेक तीन मार्च रोजी श्रीवर्धन येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये पाठविला आहे. परंतु, आज तेरा तारीख उजाडली तरीही अद्याप सदरचा चेक वटलेला नाही व रक्कम निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. यामुळे वेतनधारकांचे हाल होत आहेत.

दरम्यान, या ठिकाणचे शाखा व्यवस्थापक बदलल्यानंतर नेहमीचा अनुभव अनेक निवृत्ती वेतनधारकांना येत असतो. भारतीय स्टेट बँकेकडून ज्याप्रमाणे कर्मचार्‍यांना ट्रेनिंग दिली जाते, तसेच ग्राहकांशी सभ्यतेने बोलण्याची ट्रेनिंगदेखील देण्याची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनच्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे परप्रांतीय होते. त्यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये संवाद साधण्यांमध्ये व्यत्यय येत असे; परंतु आजमितीला या ठिकाणी सर्व अधिकारी व कर्मचारी मराठी असल्याने ग्राहकांचा अधिकार्‍यांजवळ सुसंवाद साधला जात आहे. परंतु, कर्मचार्‍यांनादेखील सभ्यतेने बोलण्याचे धडे भारतीय स्टेट बँकेने द्यावे, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.

श्रीवर्धन पंचायत समितीने काही निवृत्ती वेतनधारकांचा चेक तीन मार्च रोजी श्रीवर्धन येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये पाठविला आहे. परंतु, आज तेरा तारीख उजाडली तरीही अद्याप सदरचा चेक वटलेला नाही व रक्कम निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. वास्तविक पाहता, स्थानिक ठिकाणचा चेक तीन दिवसांत वटणे क्रमप्राप्त असते. जरी सुट्ट्या वगळल्या तरी सहा दिवस उलटून गेल्यानंतरदेखील स्टेट बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. बँकेमध्ये अधिकार्‍यांकडे निवृत्ती वेतनधारकांनी चौकशी केली असता, अजून दोन ते तीन दिवस पैसे जमा होण्यासाठी लागतील, असे सांगण्यात आले. तरी स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या कारभाराबाबत योग्य ती चौकशी करावी व बँकेच्या अधिकार्‍यांना समज द्यावी. जेणेकरून निवृत्ती वेतनधारकांना आपले निवृत्तीवेतन वेळेवर मिळेल असे पाहावे.

पंचायत समिती, श्रीवर्धन यांच्याकडून निवृत्ती वेतनाचा चेक भारतीय स्टेट बँकेच्या श्रीवर्धन शाखेत पाठविल्यानंतर तो वटविण्यासाठी त्वरित पाठविला जात नाही. नेहमी कोणते तरी कारण सांगून विनाकारण विलंब होत असतो. ही प्रत्येक महिन्याला अशीच वेळ येते. – वि.का. चौकर, निवृत्त प्राथमिक शिक्षक

Exit mobile version