पर्ल फ्रेट कंपनीत कामगारांना पगारवाढ

| उरण | वार्ताहर |
जीडीएल मध्ये कार्यरत पर्ल फ्रेट कंपनीतील 224 स्थानिक कामगारांना (लोकल लेबर) यांचा वेतनवाढीचा करारनामा करण्यात आला. सदर करारनाम्यां वर सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी यांच्या समक्ष सह्या करून दोन्ही पक्षांनी आपली मान्यता दर्शिवली. करारनाम्यानुसार पुढील तीन वर्षांकरिता रुपये 7900/- पगारवाढ, कामगार व त्यांच्यावर अवलंबित परिवारातील सदस्यांना रुपये 3,00,000/- वैद्यकीय विमा, सेवानिवृत्त कामगार/मयत कामगार यांच्या जागेवर त्यांचा वारसांना नोकरी मिळणार, सेवानिवृत्त कामगार / मयत कामगार यांच्या वारसांना रुपये 8,00,000/- कायदेशीर देण्या व्यतिरिक्त देण्यात येणार आहेत. सदर करारनामा शीतल कुलकर्णी सहाय्यक कामगार आयुक्त, पनवेल यांच्या समक्ष सह्या करून मान्य करण्यात आला. यावेळी शिवतेज कामगार संघटनेचे अध्यक्ष, माजी आ.मनोहर भोईर,सचिव महेंद्र सावंत, युनिट अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सल्लागार के. डी. भोईर, हितेश भोईर, लाइलेश भोईर, कामगार प्रतिनिधी तसेच पर्ल फ्रेट चे शरद पाटील व वशाल पाटील उपस्थित होते.

Exit mobile version