| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील स्पीडी मल्टीमोड्स कंपनीमध्ये वेतनवाढीचा करार दि. 28 एप्रिल रोजी कामगार उपायुक्त कार्यालय, पनवेल येथे सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी यांच्या समक्ष संपन्न झाला. दरम्यान, हिंद भारतीय जनरल सेनेचे अध्यक्ष निलेश आप्पा पराडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेचे सरचिटणीस दत्तात्रय तांडेल यांच्या मार्गदर्शनखाली तसेच संघटनेचे न्यायालयीन कामकाज सचिव प्रदीप कदम यांच्या समपुदेशनाखाली आणि संघटनेचे चिटणीस बाळासाहेब साबळे यांच्या सहकार्याने हा करार करण्यात आला.
करार करण्याकरिता स्पीडी मल्टीमोडसचे युनिट अध्यक्ष तुकाराम कडू यांच्यासह पदाधिकारी अजय ठाकूर, हेमंत घरत, मोरेश्वर घरत, मच्छिंद्र कडू, प्रमोद कडू, संजय ठाकूर, जयेंद्र घरत, नारायण तांडेल यांच्यासह स्थानिक शिवसेना नेते दीपक भोईर यांचेही विषेश सहकार्य लाभले. व्यवस्थापनाच्या वतीने प्रवीण पाटील (एचआर हेड) आणि राकेश कोळी यांनी कामकाज पाहिले.