हिंदुस्तान यार्ड व सवेरा इंडियामधील कामगारांना पगारवाढ

। उरण । वार्ताहर ।
शेलघर येथील कार्यालयात सवेरा इंडिया प्रा. लि. तळोजा व हिंदुस्तान यार्ड धुतुम या कंपनीतील कामगारांसाठी एकाच दिवशी दोन पगारवाढीचे करार करण्यात आले. सवेरा इंडिया या कंपनीतील कामगारांना तीन वर्षांसाठी 8100 रुपये पगार वाढ करण्यात आली, तर हिंदुस्तान यार्ड धुतुम मधील कामगारांसाठी 5 हजार रुपये पगारवाढ करण्यात आली. या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अ‍ॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील तर सवेरा इंडियाचे ऑपरेशनल मॅनेजर अजय पवार, कामगारांतर्फे संदीप म्हात्रे, हरी पाटील, आत्माराम पाटील, सुभाष तांडेल, विनोद बारशे, रोशन भोईर, भरत बोडके तसेच हिंदुस्तान यार्ड चे डायरेक्टर जितेंद्र सिग, कामगारांतर्फे अरुण पाटील, करण ठाकूर, साईनाथ ठाकूर, किसान ठाकूर, बळीराम फोफेरकर, नारायण ठाकूर, राम ठाकूर, गणेश ठाकूर आदि उपस्थित होते.

Exit mobile version