महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थी
| उरण | वार्ताहर |
पेण येथील इकोग्लोब पॅकेजिंग प्रा.लि. या कंपनीतील कामगारांसाठी 8000 रुपये पगारवाढीचा करार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. करारनाम्यानुसार कामगारांना महागाई भत्ता, एक ग्रॉस सॅलरी बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य कराण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कंपनीच्या प्रगतीबरोबर कामगारांचीही आर्थिक परिस्थिती सुधारावयास हवी. तसेच कामगारांनी पण कंपनी आपली समजून प्रामाणिक पणे काम करावे व आपल्या मेहनतीचा मोबदला हक्काने घ्यावा.
या करारनाम्याप्रसंगी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रजी घरत, सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, कंपनीचे डायरेक्टर सिद्धी अय्यर, काँग्रेस नेते मिलिंद पाडगांवकर, मार्तंड नाखवा, संघटक – लंकेश ठाकूर, आदित्य घरत, आनंद ठाकूर, अंगद ठाकूर, राजेश ठाकूर, अजित ठाकूर, योगेश रसाळ, विवेक म्हात्रे, राजेंद्र भगत तर कामगार प्रतिनिधी, रोहन अंबाडे, जगदीश पाटील, सुनील दिघे, राम ठोंबरा व युवराज पाटील आदी उपस्थित होते.