सुप्रिटेडेन्स कंपनीमध्ये पगारवाढीचा करार

| मुंबई | प्रतिनिधी |
सुप्रिटेडेन्स ऑफ इंडिया कंपनी लिमिटेड ही सरकारी व खाजगी उद्योगामध्ये सर्व्हे करणारी एक जुनी कंपनी आहे. या कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीचा करार कोलकत्ता येथे करण्यात आला. मुंबई शाखेत काम करणारे कामगार मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सभासद आहेत. युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. शेट्ये यांच्या मार्गदर्शनानुसार युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे हे या कामगारांचे नेतृत्व करतात. कोलकत्ता येथे कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर जयंती भट्टाचारजी, मुंबई शाखेचे वरिष्ठ मॅनेजर श्री. हमिदुल्ला व विद्याधर राणे यांच्यामध्ये चर्चा होऊनसदर वेतन कराराचा कालावधी हा 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2026 असा पाच वर्षाचा असेल. या करारामुळे कामगारांना कमीत कमी 5 हजार रुपये व जास्तीत जास्त 5 हजार 900 रुपये पगारवाढ मिळणार आहे. कामगारांना पाच महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे. वार्षिक पगारवाढ ही एकूण पगाराच्या 10 टक्के मिळणार असून ती दरवर्षी जानेवारी महिन्यात मिळेल. या करार अन्वये मूळ पगार, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, कन्व्हेयन्स भत्ता, वैद्यकीय भत्ता, स्पेशल भत्ता, ट्रान्सपोर्ट भत्ता व ओव्हर टाईम भत्ता इत्यादी मध्ये वाढ होणार आहे.

करारावर युनियनच्या वतीने सेक्रेटरी विद्याधर राणे तर व्यवस्थापनाच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती जयंती भट्टाचारजी, डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर तापस भट्टाचारजी, सिनियर मॅनेजर एम. हमिदुल्ला इत्यादींनी सह्या केल्या आहेत. या वेतनकरारा दरम्यान ड. एस. के. शेट्ये यांच्या मार्गदर्शनानुसार विद्याधर राणे व त्यांना सहाय्य करणारे युनियनचे खजिनदार विकास नलावडे, कमिटी मेंबर बाबु कुटान, शेटके, सिद्धेश परब यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version