सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री

। अलिबाग । वार्ताहर ।
मुरूड, रेवदंडा व वडखळ येथे दि. 4 व 5 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बेरीयम नायट्रेट बीए एन ओ या फटाक्यांची विक्री करण्यास बंदी असताना देखील त्यांची विक्री करताना आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत.
आरोपित रा.मधली आळी, मुरुड येथील त्यांच्या स्टॉलमध्ये स्फोटक फटाके विक्री करण्याचा परवाना नसताना तसेच मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा पदधतीने सुरक्षिततेची साधने न ठेवता वरील वर्णनाचे व किंमतीचे फटाके विक्री करीत असताना सापडला. आरोपित रा.वावे, अलिबाग येथे स्टॉलमध्ये स्फोटक फटाके विक्री करण्याचा परवना नसताना तसेच मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा पदधतीने सुरक्षिततेची साधने न ठेवता वरील वर्णनाचे व किंमतीचे फटाके विक्री करीत असताना मिळून आला. मौजे वढाव गावाच्या हद्दीत वढाव नाक्यावर रस्त्यालगत सिध्दीविनायक नाँव्हेल्टी समोर आरोपी रा. दिव, ता.पेण, हा विनापरवाना सार्वजनीक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मानवी जिवित धोक्यात येईल अशा पध्दतीने सुरक्षीततेबाबत कोणत्याही प्रकारची काळजी न घेता फटाक्यांचे स्टाँल लावुन, स्फोटक पदार्थ जवळ बाळगुन, शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करून फटाक्यांची विक्री करीत असतना सापडला. याबाबत मुरुड पोलीस ठाण, रेवदंडा पोलीस ठाणे ,वडखळ पोलीस ठाणे येथे सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version