मासेमारीच्या विषारी गोळयांची विक्री

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील नदीपात्रामधील गोडया पाण्यातील मासेमारी करण्यासाठी विषारी गोळयांची विक्री करण्याकरिता स्वत:च्या राहत्या घरामध्ये बाळगून स्वत:च्या आणि फिर्यादीच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार बेबी आप्पा सुतार या महिलेने केल्यावरून पोलादपूर पोलीसांनी गाडीतळ फिर्यादीच्या घरातून आकाश बाबू सुतार आणि राजेश रवींद्र जांभळेकर यांच्याकडून 250 ग्रॅम वजनाच्या अंदाजे 200 रूपये किंमतीच्या सफेद रंगाच्या मासे मारण्याच्या विषारी गोळया हस्तगत केल्या आणि गुन्हा दाखल केला.

Exit mobile version