कोएसो नाना पाटील संकुलामध्ये आप्पासाहेबांना अभिवादन

। पेझारी । वार्ताहर ।
नारायण नागू पाटील तथा आप्पासाहेबांची 130 वी जयंती कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नारायण नागू पाटील संकुलामध्ये सोमवारी (दि.29) संपन्न झाली. याप्रसंगी कोएसोचे ज्येष्ठ संचालक सुभाष तथा पंडित पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, संस्थेचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गावडे, संकुल प्रमुख केके फडतरे, लक्ष्मी शालिनी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दिलीप पाटील तसेच सर्व सत्रप्रमुख, प्राध्यापक, आजी-माजी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी आप्पासाहेबांच्या स्मारकातील प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी शिक्षिका सायली पाटील यांनी नारायण नागू पाटील यांच्या अलौकिक कार्य कर्तुत्वाचा आढावा घेतला आणि शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले त्याबद्दल ऋण व्यक्त केले.

Exit mobile version