मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकारांना अभिवादन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार दर्पणकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ, रायगड प्रेस क्लब आणि अलिबाग प्रेस यांच्यातर्फे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, खजिनदार हर्षद कशाळकर, नाट्य समीक्षक शरद कोरडे, माजी नगरसेवक आर.के. घरत आदी उपस्थित होते.

Exit mobile version