तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांना अभिवादन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबागचे नाव सातासमुद्रापार ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुवर्णाक्षरात कोरणार विद्यार्थीप्रिय शिक्षक तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या 169 व्या जयंतीनिमित्ताने अलिबागेतील सार्वजनिक वाचनालयासमोरील त्यांच्या अर्धपुतळ्यास प्रशांत नाईक मित्रमंडळ, तपस्वी रामजी लक्ष्मण घरत अर्धपुतळा परिसर सुशोभिकरण समिती, अलिबागचे निमंत्रक श्रीरंग घरत यांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालय, अलिबागचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

अलिबागचे माजी नगरसेवक आर.के. घरत यांच्या हस्ते याप्रसंगी तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या अर्धपुतळ्यासमोर श्रीफळ वाढविण्यात आले. या जयंती समारंभास ज्येष्ठ नागरिक संघ अलिबागच्या उपाध्यक्षा चारुशिला शरद कोरडे, साहित्यिक उमाजी केळुसकर, ग्रंथालयाचे संचालक नवीन राऊत, ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, संजय कांबळे, संतोष ठाकूर, सुदाम पाटील, अरविंद घरत, सतीश सुतार, जगदीश नागे, विकास पाटील, हेमकांत सोनार, द्वारकानाथ नाईक, बिपीन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version