नाभिक समाजाकडून हुतात्म्यांना अभिवादन

| माथेरान | वार्ताहर |

दि.15 रोजी रॉयल गार्डन कर्जत येथे नाभिक समाज तालुका कर्जत यांच्या वतीने वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे पुण्यस्मरण करण्यात आले. या कार्यक्रमात माथेरानचे सुपुत्र नारायण सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी नाभिक समाजातील जास्तीत जास्त बंधू, भगिनींनी अशा कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे आणि क्रांतीज्योतीचे कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली पाहिजे, असे आवाहन केले. या कार्यक्रमास नाभिक समाजाच्या तालुका, जिल्हाध्यक्ष आणि मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version