माथेरानमध्ये हुताम्यांना अभिवादन

| माथेरान | वार्ताहर |

महाराष्ट्र दिन नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता अधीक्षक कार्यालय येथे अधीक्षक दीक्षांत देशपांडे यांच्या, तर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले होते. त्यातील एक म्हणजे माथेरानचे सुपुत्र वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या नौरोजी उद्यानातील अर्धपुतळ्याला मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील महाराजांच्या अर्धपुतळ्याला लेखापाल अंकुश इचके यांच्या हस्ते पुष्पहार, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तंभास अभियंता,पाणी पुरवठा जलनिस्सारण अभिमन्यू येळवंडे यांच्या हस्ते पुष्पहार, वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत सुभेदार कै. विनय धनावडे यांच्या शिल्पास लिपिक प्रवीण सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार, रचना लिपिक स्वागत बिरंबोले यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल स्मारक येथील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, याच स्मारकातील हुतात्म्यांच्या नामफलकास कर, प्रशासकीय सेवा अधिकारी सदानंद इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या शिल्पास आरोग्य निरीक्षक नरेंद्र सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Exit mobile version