| चिरनेर | वार्ताहर |
जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्यवीरांना 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थांमार्फत मानवंदना देण्यात आली. यावेळी उभारण्यात आलेल्या शूरवीरांच्या पूर्णाकृती शिल्पचित्रांना आणि स्मृतीस्तंभाला पुष्पमालिका अर्पण करून, स्वातंत्र्य वीरांच्या पराक्रमाच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत पंचप्राण शपथ घेण्यात आली. या शपथेचे वाचन चिरनेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महेश पवार यांनी केले.
यावेळी उपसभापती शुभांगी पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, मानसी म्हात्रे, सचिन घबाडी, परशुराम रेवसकर, हिराजी ठाकूर ,कांचन मोकल, संताजी ठाकूर, सुनील ठाकूर, किरण कुंभार, गणपत खारपाटील, बाळाराम गोंधळी तसेच हुतात्म्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.