| उरण | वार्ताहर |
सारडे विकास मंच तर्फे विकसित करण्यात आलेल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सेल्फीझोनची निर्मिती करण्यात आली आहे. देवेंद्र पाटील, शशिकांत पाटील( कोप्रोली) यांनी येणाऱ्या पर्यटकांसाठी सेल्फीझोनची निर्मिती केली आहे. उरणमधील मॉर्निग वॉकच्या द्रोणागिरी लिव लाईफ ग्रुपचे गोपाळ पाटील, घन:श्याम कडू, रमेश म्हात्रे आणि सहकारी यांच्या हस्ते या सेल्फीझोनचे पार उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी नागेंद्र म्हात्रे, हरीश म्हात्रे-खोपटे, हरीश म्हात्रे पाले, संतोष जोशी, सचिन पाटील, विनायक गावंड, तुकाराम गावंड आदी निसर्गप्रेमी उपस्थित होते. तसेच त्रिजन पाटील, रोहित पाटील,निल दानिश,निरव,विभा, सई या सर्वांचं सहकार्य लाभले नागेंद्र म्हात्रे यांनी सर्वाचे आभार मानले.