राजाराम मोरे यांना समाजभूषण पुरस्कार

वावोशी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील वावोशी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा परिषदेत प्रशासकीय अधिकारी सेवेत असणारे राजाराम मोरे यांना ’सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य’ या राज्य स्तरीय संघटनेचा उत्कृष्ट सामाजिक व प्रशासकीय सेवेसाठी दिला जाणारा राज्य स्तरीय सन 2021 च्या ’समाजभूषण’ पुरस्काराने कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांना जिल्हा व कोंकण विभागीय तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Exit mobile version