अरबी समुद्रातील स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध

। मुंबई । वृत्तसंस्था ।
संभाजी ब्रिगेडने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला विरोध केला आहे. अरबी समुद्राऐवजी स्मारक मुंबईतील राजभवनाच्या जागेवर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचे पूजन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील अरबी समुद्रात भव्यदिव्य स्मारक होणार आहे. या स्मारकाचे काम सध्या सुरु आहे. मात्र त्याला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध केला आहे. शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्यापेक्षा राजभवनाच्या जागेवर उभारण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच स्मारक बनवण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून राज्यभरात मोहीम राबवली जाणार आहे. 19 फेब्रुवारीच्या आधी संभाजी ब्रिगेडचे कार्यक्रते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतची भूमिका मांडणार आहेत. राजभवनाची जागा उपलब्ध करून दिली तर संभाजी ब्रिगेड गावागावात जाऊन निधी उभारणीचे काम करणार आहे. तशी माहिती संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

Exit mobile version