संभे शाळेचा रंगरंगोटीने केला कायापालट

| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभे येथील शाळेत प्रशांत सानप यांच्या प्रयत्नातून व पोस्को एमआयडीसी तसेच कारवान रोडव्हेज प्रा.लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या एका वर्गखोलीला पीओपी, पूर्ण शाळेला रंगरंगोटी, तसेच एज्युकेशन ऑल पेटिंग करून सुशोभीकरण करण्यात आले.

जागतिक स्तरावर उद्योग व्यवसायात नामांकित असलेल्या पोस्को एमआयडीसी यांच्या सौजन्याने पीओपी व रंगरंगोटी करून शाळेचे पूर्णपणे पालटले आहे.
याचे उद्घाटन कोरियन व्यवस्थापक एम. डी. मंकीचून, जी.एम डॉग हुकॉन, कारवान कंपनीचे मॅनेजर हरिकेश शर्मा, तसेच सुधीर भोसले सिनियर मॅनेजर पोस्को एमआयडीसी, संभे ग्रामपंचायत उपसरपंच राजेश्री सानप, पोलीस पाटील अनंत सानप, पांडुरंग सानप, देविदास सानप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जुईली दहिंबेकर, नारायण दहिंबेकर, मनोहर सानप, सागर दहिंबेकर, अंगणवाडी सेविका संगिता सानप मदतनीस सुरेखा सानप व असंख्य पालक वर्ग यांच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्यध्यापिका प्रिया पवार यांनी केले तर उपशिक्षिका रेश्मा जमादार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version