। रोहा । प्रतिनिधी ।
संभे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. आज रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत उपसरपंच पदासाठी राजेश्री राजेश सानप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केले आहे.
रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस राजेश सानप यांच्या त्या पत्नी असून राजेश्री सानप यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, माजी आ.धैर्यशील पाटील, निलिमा पाटील, सरपंच समीर महाबळे, शिवराम महाबळे, योगेश सानप, संतोष सानप, मनोहर महाबळे, शंकरराव म्हसकर, मारुती खांडेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.