| पाताळगंगा | प्रतिनिधी |
रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेली खालापूर प्रेस क्लब 19 वा वर्धापन दिन महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीची दखल त्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला,यावेळी 17 पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत इसांबे उपसरपंच समीर देवघरे यांस आदर्श पर्यावरण प्रेमीने सन्मानित, करण्यात आले. यावेळी सह कुटूंब उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळा सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले होते. अल्प वयातच राजकारणाचे धडे गिरवत सदस्य ते उपसरपंच या पदावर विराजमान झाले.मात्र आपल्या कामातून समाज्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल अबाधित राहावे यासाठी त्यांनी स्वताला झोकून दिले. त्यांच्या कामाची दखल खालापूर प्रेस क्लब आयोजित वर्धापन दिन तथा पुरस्कार सोहळ्यास त्यांस सन्मानित करण्यात आले.
समीर देवघरे हे उत्तम व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते, आजवर त्यांनी अनेक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करीत असल्यामुळे त्यांस आदर्श पर्यावरण प्रेमी पुरस्कार खोपोली नगराध्यक्ष कुलदीप शेंडे, उप नगराध्यक्ष विक्रम साबळे, वृत्तनिवेदिका न्युज 18 सुवर्णा जोशी, बिग बॉस
फेम सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, खासदार मावळ लोकसभा श्रीरंग आप्पा बारणे, रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा गट नेते संतोष बैलमारे, सचिव अ.भा.म.प.महाराष्ट्र राज्य मनोज खांबे, तसेच खालापूर, खोपोली पोलीस अधिकारी यांच्या उपस्थित हा पुरस्कार त्यांस प्रदान करण्यात आला.
समीर देवघरे आदर्श पर्यावरण प्रेमीने सन्मानित
