म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळ्याचे तहसीलदार शरद गोसावी हे 31 ऑगस्ट रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने रिक्त असलेल्या पदावर खेड (रत्नागिरी) येथील अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण या पदावर कार्यरत असलेले समीर घारे यांची नियुक्ती झाली आहे.
घारे यांची बहुतांश सेवा कोकणात झाल्याने कोकणावर येणार्या नैसर्गिक आपत्ती व अन्य संकटांचा त्यांना अभ्यास आहे. आमच्या प्रतिनिधिशी बोलताना घारे यांनी तालुक्याच्या स्वच्छतेवर अधिक भर देऊन शहरासह संपूर्ण तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. यासाठी प्रशासन आणि पत्रकार संघ यामध्ये समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या पदाची सूत्रे स्वीकारताच तहसीलदार समीर घारे यांनी तालुका पत्रकार संघाच्या ताब्यात मास्कचा बॉक्स सोपवून त्याचे वाटप होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी संजय खांबेटे, तालुकापत्रकार संघांचे अध्यक्ष लरर्ली शिर्के, अशोक काते, महेश पवार, नायब तहसीलदार के.टी.भिंगारे, नायब तहसीलदार पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.