संदीप पाटील कार्यकारी संचालक

| नेरळ | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील महावितरणचे मुख्य अभियंता संदीप पाटील यांना बढती मिळाली आहे. पाटील यांची महावितरणचे कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती झाली असून, सर्वात तरुण संचालक होण्याचा मान रायगडकर संदीप पाटील यांना मिळाला आहे.

संदीप पाटील हे मूळचे अलिबाग तालुक्यातील सांबरी येथील रहिवासी असून, त्यांनी वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. कार्यकारी संचालकपदी निवड होण्यापूर्वी त्यांनी महावितरणमध्ये मुख्य अभियंता म्हणून अत्यंत यशस्वीपणे आणि कार्यक्षमतेने जबाबदारी सांभाळली होती. गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणच्या सेवेत असलेले संदीप पाटील यांची ओळख एक अत्यंत हुशार, शांत, संयमी आणि अत्यंत अभ्यासु असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महावितरणच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कार्यकारी संचालकपदी संदीप सुरेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते आगरी समाजातील पहिले आणि महाराष्ट्रातील सर्वात तरुण अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे आगरी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version