संघाला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज

। लाहोर । वृत्तसंस्था ।

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू बाबर आझम अँड कंपनीवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनीही बाबर आझम टीमला अल्टीमेटम देत, आमच्या संघाला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे म्हटले आहे.

टी-20 विश्‍वचषकात भारताविरुद्ध 6 धावांनी पराभव झाल्यानंतर बाबर आझम आणि कंपनीला सध्याच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला साखळी टप्प्यातील उर्वरित सामन्यांमध्ये मोठा विजय मिळवावा लागेल. तसेच, भारत आपले उर्वरित सामने जिंकेल त्याचबरोबर अमेरिका आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाली तर पाकिस्तानच्या आशा नक्कीच पल्लवित राहणार आहेत. असे झाल्यास पाकिस्तान सुपर-8 मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, भारताविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवानंतर, माजी पाकिस्तानी दिग्गजाने बाबर आझम आणि कंपनीवर जोरदार टीका केली आहे. आता या यादीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यांनी थेट बाबर आझम टीमला अल्टीमेटम दिला आहे.

Exit mobile version