बांगलादेशवर साकारला दमदार विजय
| अॅडिलेड | वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अतिशय महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानच्या संघानं बांगलादेशचा पाच विकेट्सनं धुव्वा उडवला. या विजयासह पाकिस्तानच्या संघानं सेमीफायनलमध्ये धडक दिली. प्रारंभी नाणेफेक जिंकून बांगलादेशनं पाकिस्तानसमोर 128 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे लक्ष्य 18.1 षटक आणि पाच विकेट्स राखून पूर्ण केलं. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात चार विकेट्स घेऊन बांगलादेशच्या संघाला बॅकफूटवर ढकललं.
या सामन्यात बांगलादेशच्या संघानं दिलेल्या 128 लक्ष्याच्या पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार बाबर आझम (25 धावा) आणि सलामीवीर मोहम्मद रिझवानं (32 धावा) यांच्यात पहिल्या विकेट्ससाठी 57 धावांची भागिदारी झाली. त्यानंतर बाबर आझमच्या रुपात पाकिस्तानच्या संघाला पहिला धक्का लागला. तर, पाकिस्तानची धावसंख्या 61 वर असताना बाद होऊन माघारी परतला. या सामन्यात सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्य संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. या सामन्यात शाहीन आफ्रिदीनं चार विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी व्यतिरिक्त शादाब खाननंही चांगली गोलंदाजी केली. त्यानं या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. या विजयासह पाकिस्तानच्या संघानं बांगलादेशच्या संघाला हरवून सेमीफायनलमध्ये धडक दिली.