भीमाशंकर अभयारण्यात वनविभागाकडून स्वच्छता कर

ट्रेकर्स आणि शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर
| नेरळ | वार्ताहर |

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर महाराज यांच्या मंदिरात श्रावण महिन्यात लाखो भाविक जात असतात. मुंबईकडील भागातील शिवभक्त आणि ट्रेकर्स हे भीमाशंकर अभयारण्य येथून चालत जात असतात. मात्र, भीमाशंकर अभयारण्याच्या जंगल भागातील स्वच्छता टिकावी यासाठी वन विभागाने स्वच्छता कर लावण्याचा निर्णय घेतला असून, ट्रेकर्स आणि भक्तांकडून 60 रुपये आकारले जकात आहेत. दरम्यान, वन विभागाच्या या कृतीबद्दल शिवभक्त आणि ट्रेकर्स यांच्यासाठी नाराजी पसरली आहे.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात भीमाशंकर महाराज यांच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी केली असते.श्रावणी सोमवारी तर लाखोंच्या संख्यने शिवभक्त भीमाशंकर येथे पोहोचतात आणि दर्शन घेत असतात. भीमाशंकरला जाण्यासाठी अभयारण्य जंगलातून पायवाट कर्जत तालुक्यातून जाते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा भीमाशंकरला जाण्यासाठी मध्यमवर्गीय भक्त कर्जत तालुक्यातून जाणार्‍या वाट निवडत असतात. मात्र, तीन तास चालत भीमाशंकर मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर शिवभक्त आणि ट्रेकर्स यांचा खिसा खाली होतो. कारण, यावर्षीपासून भीमाशंकर अभयारण्यात फेरफटका मारणार्‍या पर्यटक, ट्रेकर्स आणि शिवभक्त यांच्याकडून वन विभागाने स्वच्छता कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच फटका रायगड तसेच मुंबई, ठाणे येथील ट्रेकर्स आणि शिवभक्त यांना बसत आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब शिवभक्त हे आर्थिक स्थिती नाजूक असल्याने तीन तास चालत डोंगर चढून भीमाशंकर महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात आणि त्यांना 60 रुपये भुर्दंड भरावा लागत असल्याने शिवभक्तात नाराजी पसरली आहे.

आमच्या ग्रामपंचायत च्या भागातून जाताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही घेतो असतो. असे असताना वन विभाग भीमाशंकर येथे 60 रुपये स्वच्छता कर आकारात आहेत, हे चुकीचे आहे.

– मंगल ऐनकर, सरपंच, खांडस ग्रामपंचायत

भीमाशंकर तलाव येथे वन विभाग पर्यटक ट्रेकर्स आणि शिवभक्त यांच्याकडून स्वच्छता कर वसूल करीत होते. अनेक शिवभक्त हे स्थानिक असल्याचे सांगत होते, तरी वन विभाग ऐकत नव्हते. तर, आम्ही त्यांना आम्ही प्लास्टिक कचरा सोबत आणला आहे असे दाखवून देऊनदेखील कर आकाराला जात आहे.

– डॉ. दिनेश चौरासिया, ट्रेकर


आमच्या तालुक्यातील शेकडो शिवभक्त हे भगवान भीमाशंकर महाराज यांच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. त्यात स्थानिक असंख्य शिवभक्त हे दर सोमवारी चालत भीमहांकार पोहचत असतात. त्यामुळे वन विभागाने लावलेले कर आमच्यासारख्या जंगलाचे रक्षण करणार्‍या स्थानिक यांच्यासाठी अन्यायकारक आहे. त्याचा फेरविचार वन विभागाने करायला हवा.

– कैलाश भोईर, स्थानिक शिवभक्त
Exit mobile version