कुरुळ येथे स्वच्छता अभियान

। अलिबाग । वार्ताहर ।
माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र, रायगड जिल्हा परिषद कुरूळ ग्रामपंचायत, कुरूळ ग्रामस्थ, लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला व तो पुनरप्रक्रिये साठी पाठवण्यात आला, तसेच याठिकाणी तलावाच्या आजूबाजूला सीड बॉलचे रोपण करण्यात आले हे जवळजवळ 100 सीड बॉल लावण्यात आले. पूर्ण गावातील लोकांना आवाहन करण्यात आले की प्लास्टिकचा वापर कमी करा, इकडे तिकडे प्लास्टिक फेकू नका, प्लास्टिक पुनर्वापर करता द्या व आपला परिसर स्वच्छ ठेवावा.

माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून स्वच्छतेमुळे निरोगी कसे राहता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. शासन व ग्रामपंचायत तसेच अनेक स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या तर सामाजिक काम खूप मोठ्या प्रमाणात होईल व अशाच पद्धतीने लोकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आदि मोहीम पार पडाव्यात असे आवाहन केले.
रायगड जिल्हा परिषद समन्वयक जयवंत गायकवाड सर यांनी डॉ. किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृत सरोवर अभियाना अंतर्गत तलाव स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे नागरिकानी प्लाटिक उघड्यावर टाकू नये त्याचे व्यवस्थापण करावे व सामाजिक कार्य कसे करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कुरूळ ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य सर्व लायन्स क्लब सदस्य व माणुसकी टीम, रायगड जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वछता मिशन कक्ष , रायगड जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील कार्यक्रमास मार्गदर्शन केले.याप्रसंगी माजी जि.प. सदस्य संजय पाटील, माजी जि.प. सदस्या प्रियदर्शनी पाटील, कुरुळ उपसरपंच स्वाती पाटील, लायन्स क्लब अध्यक्ष भगवान मालपाणी, जि.प. स्वच्छता विभाग अध्यक्ष जयवंत गायकवाड, लायन्स क्लब अलिबाग सदस्या रेखा म्हात्रे, माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग अध्यक्ष भूषण जंजिरकर, महिला अध्यक्ष उज्ज्वला चव्हाण, सेक्रेटरी अलिबाग हुलवाल, सुयश पाटील, संपर्क प्रमुख भूपेंद्र पाटील, विजय पाटील, महेंद्र पाटील, ग्रा.पं. सदस्य भूषण बिरजे, अवधूत पाटील, रेश्मा पाटील, रुपाली पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यकर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रचे सूत्रसंचालन श्रीहरी खखरात यांनी केले.

आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपला महाराष्ट्र स्वच्छ दिसेल. आपल्या निसर्गाची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे, तसेच वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे, तरच निसर्गाची नैसर्गिकता जपली जाईल.

-डॉ राजाराम हुलवान, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष

माणुसकी प्रतिष्ठान व लायन्स क्लब अलिबाग यांनी स्वच्छता अभियान राबवून खूप चांगली कामगिरी केली आहे. पर्यावरणाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि यासारख्या स्वच्छता अभियानामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा.

– जयवंत गायकवाड समन्वयक




Exit mobile version