। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान या पर्यटन क्षेत्रावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची रेलचेल सुरू असते. त्यामुळे त्यांच्या जवळील ओला ,सुका कचरा हा पॉइंटसच्या काही ठिकाणी कचराकुंडी नसल्याने जंगलात टाकला जातो त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून प्लास्टिक बाटल्यांमुळे झाडांना धोका निर्माण होत आहे याकामी येथील प्रभाग क्रमांक सात मधील एक होतकरू आणि कार्यतत्पर युवा कार्यकर्ते, अश्वपाल, धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांनी आपले जीवन एकप्रकारे या गावाच्या उत्कर्षासाठीच झिजविण्यासाठी इथे स्वच्छता कायमस्वरूपी असावी यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत.त्यास त्यांच्या मित्रमंडळीची साथ लाभत आहे.दि. 23 रोजी त्यांनी आपल्या नेहमीच्या मित्रमंडळी सोबत येथील शारलोट लेक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी सर्वांनी या भागात जवळपास आठ ते नऊ हजार पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या तसेच अन्य सुका कचरा गोळा केला आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन करिता लाखो रुपये खर्च करून संबंधीत ठेकेदारांना या कामाचे टेंडर देण्यात येते मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा कसा साठला जातो यावर प्रशासनाचा अंकुश आहे की नाही असे बोलले जात आहे. दरवेळेस राकेश कोकळे यांसारख्या होतकरू तरुणांना गावाच्या सेवेसाठी श्रमदान करावे लागते.हे अजून कुठपर्यंत सुरू राहणार आहे यावर लवकरच नगरपरिषदेने लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे सुध्दा बोलले जात आहे. या स्वच्छता मोहीमेत राकेश कोकळे, दिक्षांत देशपांडे, प्रकाश मोरे ,किशोर कासुरडे, दीपक रांजणे, राजू जाबरे, गणेश बिरामने, अर्जून जानकर ,अनिकेत कोकरे, पंकज कोकरे, जितेश कदम ,अनंता ओखारे ,विलास चव्हाण ,शुभम सकपाळ, अक्षय नाईकरे, करण जानकर आदी सहभागी झाले होते.
शारलोट लेक या जगलांत स्वच्छता अभियान राबविण्यात आले जवळपास 27 गोणी म्हणजे 7 ते8 हजार बिस्लरी बॉटल तसेंच प्लास्टिक उचलण्यात आले.माथेरानचे पर्यटन सुस्थितीत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी राकेश यांची गावासाठी पावसाळ्यात सुध्दा जी काही धडपड सुरू आहे,प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे असून यामध्ये त्यांना सर्वानी हातभार लावणे गरजेचे आहे.
दिक्षांत देशपांडे, माथेरान अधीक्षक