माणगाव रेल्वे स्थानकाची स्वच्छता

| माणगाव | वार्ताहर |

जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे, टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज माणगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी आणि डी.एल.एल.ई. मधील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्ती अभियान रॅलीमध्ये सहभाग घेऊन माणगाव रेल्वे स्थानकाची स्वच्छता मंगळवार दि.12 सप्टेंबर रोजी करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी सुरुवातीला अप आणि डाऊन साईडचे दोन्ही प्लॅटफॉर्मवरील प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरीबॅग, चॉकलेटचे कागद, प्लास्टिक ग्लास तसेच इतर कचरा गोळा करून साफसफाई केली. त्यामध्ये सात ते आठ मोठ्या प्लास्टिक बॅग कचरा विद्यार्थ्यांनी जमा करून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याची विल्हेवाट लावली. यावेळी, कोकण रेल्वेचे अधिकारी करंदीकर, तन्मय धुमाळ, माणगाव रेल्वे स्थानक येथील कर्मचारी, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. चंद्रकांत बन्सी माळी व महाविद्यालयातील सेवक अशोक पाटील या अभियानात सहभागी झाले होते.

Exit mobile version