संजय गांधी योजना समिती बैठक

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

चिपळूण येथील तहसील कार्यालयात संजय गांधी योजना समितीच्या बैठकीत संजय गांधी अनुदान योजनेसह विविध योजनेची एकूण 96 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संजय गांधी योजना समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची बैठक तहसील कार्यालयात संपन्न झाली.

या बैठकीत संजय गांधी अनुदान योजनेची 73 प्रकरणे व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची 18 प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा अनुदान योजनेचे 1 प्रकरण, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची 4 प्रकरणे अशी एकूण 96 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यावेळी अध्यक्ष शौकत माखजनकर, सदस्य तुकाराम मोहिते, मानसी कदम, राजन निगडे, अशोक भडवलकर, तहसीलदार प्रवीण लोकरे आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version