संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
गोरेगाव इथल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने काल रात्री उशिरा अटक केली. राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येईल. १६ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केले.

संजय राऊत यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने राऊत यांना ४ ऑगस्टापर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version