। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मल्हार मटणवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, कुणी कोणाकडून काय खावं यावर कुणी कायदे करत नाही. राजकीय स्वार्थासाठी धर्माच्या नावावर भाजपला देशाचा पाकिस्तान-अफगाणिस्तान करायचा आहे.
राऊत म्हणाले की, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हता. या देशाचे स्वातंत्र्य मिळवताना सर्व जातीची, धर्माची लोकं होती, तेव्हा हा देश स्वतंत्र झाला. त्या लढ्यात ना भाजप, संघ होता ना जे आता खटके लटके करत होते त्यांचे बापजादे नव्हते. तसेच, काँग्रेस गांधीच्या नेतृत्वाखाली सर्व जातीचे लोकं होते अगदी आदिवाशी, भिल्ल, मु्स्लीमदेखील आहेत, फासावर गेले आहेत. हिंदू लोकच या झटका मटणवाल्यांना झटका देणार, पागल झाले आहेत ते, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले.