| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्याच्या कास्ट्रईब कर्मचारी महासंघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संजीव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी संजीव मोरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची विभागीय अध्यक्ष तसेच रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. संजीव मोरे हे कर्मचारी प्रश्न, सामाजिक कार्य तसेच विविध सामाजिक उपक्रमामध्ये सक्रीय पणे कार्यरत असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कोकण विभागातील कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीबद्दल सचिन ओव्हाळ, संतोष साळावकर, विकास बडे अंजली वर्तक, अभिजीत पालवे, खंडू बागूल, राजेंद्र गायकवाड, अनंत बनसोडे, अशोक कुकलारे, संतोष बनसोडे, संजीव चोपडे यांच्यासह विविध मान्यवरांनी संजीव मोरे यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संघटनेची ताकद अधिक बळकट करण्यासाठी संजीव मोरे यांच्या नेतृत्वाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.







