| चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूण तालुक्यातील टेरव गावचे संजीत रघुनाथराव कदम, सुभेदार, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह यांना पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती सुधार सेवा पदक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट व प्रशंसनीय कामगिरी बद्दल या पूर्वी 2015 मध्ये राष्ट्रपती पदकाने तसेच 1 मे, 2022 रोजी महाराष्ट्र दिनी महासंचालक पदक देवून गौरविण्यात आले होते. कदम हे 1992 साली येरवडा कारागृह येथे शासकीय सेवेत रुजू झाले. ते उत्कृष्ट कबड्डी व व्हॉलीबॉल खेळाडू असून त्यांनी अनेक वेळा कारागृहाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.