संत नामदेव समाधी सोहळा

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरूड शिंपी समाजातर्फे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा 674 वा समाधी सोहळा मुरूड येथील शिंपी समाज हॉल मध्ये मंगळवारी (दि.30) उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी येथील समाजाचे अध्यक्ष्य विजय करंबे दाम्पत्याचे हस्ते संत नामदेव प्रतिमेचे विधिवत पूजन झाले. यानंतर समाजच्या महिलांनी संत नामदेवचे अभंग तालासुरात गाऊन आनंद साजरा केला. मुरूड समाज बांधव गेली कित्येक वर्षे हा धार्मिक सोहळा भक्तीपूर्वक साजरा करीत असून अलीकडे 12 वर्षांपासून समाजाच्या स्वतः च्या हॉलमध्ये हा सोहळा होत असतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुरूड शिंपी समाज अध्यक्ष विजय करंबे, सुरेश सद्रे, गौरव हणमंते, सिद्धेश करंबे, सौरभ नाझरे, सिद्देश लखमदे, राजेंद्र कजबजे, दर्शन काळबेरे आदींनी परीश्रम घेतले.

Exit mobile version