माणगावात बीज सोहळ्याचे आयोजन

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही सर्व सांप्रदाय भक्तांच्या सहकार्याने तमाम वारकरी सांप्रदायिक भक्त मंडळींच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज बीज सोहळा बुधवारी (दि.27) कुणबी भवन येथे साजरा करण्यात येणार आहे. तरी या सोहळ्यात भक्तगण स्त्री-पुरुषांनी व समाज बांधवानी सहभागी होऊन सुखांनद घ्यावा, अशी विनंती बीज सोहळा संस्थापक महादेवराव बक्कम, रामभाऊ टेंबे, मुरकर महाराज यांनी केली आहे.

यादिवशी सकाळी 7 वाजता मूर्तीचे पूजन, 9 ते 11 यावेळेत आदर्श प्राथमिक विद्यामंदिर उतखोल विद्यार्थ्यांचे संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा, 11 ते 12 दरम्यान जयराम खाडे यांचे कीर्तन, दुपारी 1 ते 3 यावेळेत माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळातर्फे महाप्रसाद असे दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version