संत श्री बाळूमामा उत्सव

। खोपोली । प्रतिनिधी ।

अखंड भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव दि.22 व 23 एप्रिल या दोन दिवस लोणावळा येथील पांगोळी धनगरवस्ती येथे आयोजित करण्यात आला आहे.

पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पागोळी लोणावळा येथे संत श्री बाळूमामाच्या देवाचे भव्य मंदिर असून दररोज लाखो भाविक भक्त येथे येत असतात. दरवर्षी मोठया उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे या वर्षी दोन दिवस या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी (दि.22) सायंकाळी 4 वाजता भजन, 6 वाजता संजीवनी शिंगाडे यांचे कीर्तन, 7 वाजता महाआरती, 9 वाजता होम मिनिस्टर तर, मंगळवारी (दि.23) सकाळी 6 वाजता अभिषेक, 7:30 वाजता महाआरती, 9 वाजता सत्यनारायण महापूजा, 10 वाजता भजन, 12 वाजता होमहवन, सायंकाळी 4 वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक, 7:30 वाजता महाआरती, 8 वाजता श्रींची भाकनूक, 9:30 वाजता महाप्रसाद होणार आहे.

या संत श्री बाळू मामा देवाच्या उत्सावाला सर्व भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत श्री बाळू मामा देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्‍वस्त तथा माजी आदर्श सरपंच बबन खरात यांनी केले आहे

Exit mobile version