| रेवदंडा | महेंद्र खैरे |
साळाव बिर्ला मंदिर नजीकच निडी येथील श्री राम मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दा व भक्तीचे स्थान असून रामनवमी उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.

निडी गावातील ग्रामस्थांनी सन 1961 साली भव्य असे सागवान लाकडाचा वापर करून भव्य मंदिर उभारले, व स्थापना केली. मंदिरात राजस्थान येथून श्री राम,लक्ष्मण, सितामाता हनुमंत यांच्या मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून आजतागायत निडी येथे श्री रामनवमी उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवाला, श्री राम जन्म दिनी पंचक्रोशीतील श्री राम भक्त भाविक मोठया संख्येने येतात, या दिवशी मंदिरात पुजाअर्चासह, भजन, भक्तीगीते, महाप्रसाद व सांस्कृतिक आदी कार्यक्रमाचे नियोजन प्रतिवर्षी केले जाते. श्री राम नवमी उत्सवाचे निमित्ताने मंदिरात विदयुत रोषणाई व विविध फुलांनी सजावट करण्यात येते, श्री राम जन्म उत्सव दिन मोठया उत्साहात भाविकतेने साजरा केला जातो. यावेळी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
या वर्षी रामनवमी निमित्त दुपारी साडेबारा वाजता श्री राम जन्मोत्सौव सोहळा, दुपारी एक वाजता मान्यवरांचे स्वागत, दुपारी एक ते तिन पर्यंत महाप्रसाद, दुपारी दोन वाजता जय हनुमान प्रासादिनक भजन मंडळ खारीकपाडा, सायकांळी पाच वाजता श्री ची पालखी सोहळा व मिरवणूक, रात्री अकरा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात ग्रामस्थ मंडळ निडी यांचे वतीने करण्यात आले आहे.