संत तुकाराम देहेन कबड्डी स्पर्धा

जय बजरंग रोहा अजिंक्य

| भाकरवड | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत श्रीगाव हद्दीतील देहेन येथे संत तुकाराम क्रीडा मंडळाच्या वतीने, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात 32 संघानी सहभाग घेतला होता. या सामन्यांसाठी उद्घाटक म्हणून माजी आमदार पंडित पाटील, अ‍ॅड आस्वाद पाटील यांची उपस्थिती लाभली होती.

या सामन्यात प्रथम क्रमांक जय बजरंग रोहा, द्वितीय क्रमांक शिवाई बांधन, तृतीय क्रमांक श्री राम कमलपाडा, चतुर्थ क्रमांक आक्का देवी पांडापुर यांनी पटकावला. विजेत्या संघाना अनुक्रमे 15 हजार, 10 हजार, 7 हजार व आकर्षक चषक, तर या सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू राकेश गायकवाड रोहा, उत्कृष्ट पक्कड जय जुईकर पांडापुर, उत्कृष्ट चढाई दर्शन भिंगे बांधन, पब्लिक हिरो आविष्कार पाटील कमळपाडा आदींना सन्मानचिन्ह व रोख रक्कम 1200 रुपये देऊन स्व. रामदास राऊत कुटुंबाकडून गौरविण्यात आले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कैलाश राऊत, संकेत पाटील, सहदेव म्हात्रे, प्रेमनाथ राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. या सामन्यांसाठी सूत्र संचालन रवींद्र पाटील, प्रेमनाथ राऊत यांनी केले तर सामने पार पाडण्यासाठी संत तुकाराम क्रीडा मंडळाच्या सर्व सभासद, महिला वर्ग , ग्रामस्थ देहेन, यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version