कर्जतकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील गिर्यारोहक संतोष दगडे हे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कर्जतकरांनी आणि ध्वज प्रदान सोहळ्यासाठी गर्दी केली होती.
संतोष दगडे हे गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेवर निघाले होते. महालक्ष्मी मंदिर यांच्या वतीने कर्जत येथील रॉयल गार्डन आयोजित केला होता. त्यावेळी ध्वज प्रदान सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे जेष्ठ गिर्यारोहक वसंत लिमये हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी माऊंट एव्हरेस्ट मिशन विषयी माहिती देताना किती खडतर मोहीम आहे याची माहिती दिली. जिद्द आणि चिकाटी यात संतोष दगडे आघाडीवर आहे. त्यामुळे तो नक्कीच एव्हरेसट सर करील अशा आशावाद व्यक्त केला. माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झालेले संतोष दगडे यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करेनच अशी ग्वाही उपस्थित कर्जतकरांना देऊन सातही खंडातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणे हे आपले लक्ष्य आहे. युवकांनी जीवनात ध्येय ठेवावे, त्या ध्येयासाठी वेडे व्हावे, सतत लढावे, यश मिळेलच असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी आ.सुरेश लाड, नितिन सावंत, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नाना वैद्य, बळवंत घुमरे, राजाभाऊ कोठारी, डॉ. रत्नराज जैन, बंधु पाटील, नगरसेवक अॅड. संकेत भासे, दीपक बेहरे,विकास चित्ते, महेंद्र कर्वे, महेंद्र भंडारे, पद्माकर गायकवाड, सगळगिळे, मच्छिंद्र यादव, ऋषिकेश दानवे, संतोष कांबळे, अभय गुरव, अभिषेक सुर्वे, दिनेश कडू, प्रकाश पटवर्धन, संदीप दिवाडकर, प्रदीप गोगटे, नदीमखान, सचिन भोईर आदी उपस्थित होते.