संतोष मुसळे सेवानिवृत्त

। कोलाड । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील गोवे गावचे रहिवाशी संतोष विठ्ठल मुसळे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतुन वयोमानानुसार त्यांच्या वयाच्या 58व्या वर्षी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवा निवृत्तनिमित्त सत्कार समारंभ सोहळा विद्युत वितरण कंपनीच्या अलिबाग उपविभागीय कार्यालयात नुकताच संपन्न झाला. संतोष मुसळे यांनी विद्युत वितरण कंपनीमध्ये अनेक वर्षे सेवा केली. रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात त्यांनी विद्युत वितरण कंपनीत प्रामाणिकपणे काम केले. यावेळी महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच संतोष मुसळे यांची पत्नी व परिवार उपस्थित होता.

Exit mobile version