| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्यातील जोगेश्वरी नगर (गावठाण) येथील रहिवासी व व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे वास्तव्यास असलेले संतोष उर्फ आण्णा सुदाम साळुंखे (वय 45) यांचे नुकतेच पुणे येथील रूग्णालयात गुरूवारी (दि.21) निधन झाले. नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे व मच्छिंद्र साळुंखे यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे. उत्तरकार्य सोमवार दि. 1 ऑगस्टला होणार आहे.