। अलिबाग । वार्ताहर ।
कोल्हापूरच्या जिम स्विम अकॅडमीच्या आयोजनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने विजयदुर्ग येथे दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने रविवारी (दि.20) खुल्या सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये वय वर्षे 5 ते 70 पर्यंतचे 100हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये पनवेल येथील सारा अभिजीत वर्तक हिने 7 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या जलतरण स्पर्धेचे नियोजन दुर्गामाता मंडळाच्या सचिव संजना आळवे, रविकांत राणे, दीपक कारंजे तसेच जिम स्विम अकॅडमीचे अजय ओर्गानिझिंग सेक्रेटरी अजय पाठक यांनी केले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने व सचिव राजेंद्र पालकर तसेच चेअरमन सुधाकर शानभाग यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे स्पर्धा निरीक्षक कैलाश आखाडे उपस्थित होते. तर सुधीर चोरगे, विश्वेश दूधम, गंगाराम बरगे, शुभांगी मंगलोरकर व शैलेश सिंग यांनी पंच म्हणून काम पहिले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देवगड तहसीलदार आर.जे. पवार, बंदर निरीक्षक महाडिक, विजयदुर्ग प्रभारी सरपंच रियाझ काझी आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
500 मीटर 7 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम रेयांश खामकर, द्वितीय मयांक चव्हाण, तृतीय शिवांश खोत तर मुलींमध्ये प्रथम सारा वर्तक (रायगड), द्वितीय समिधा गेंजगे व तृतीय लिनांशा नाईक.
1 किमी 9 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम शिवांशु खोराटे, द्वितीय हर्षवर्धन कार्लेकर, तृतीय अद्वैत पाटील. 11 वर्षांखालील मुलांमध्ये प्रथम शिवांश पाटील, द्वितीय साईश कड-देशमुख, तृतीय कनिष्क नाईक तर मुलींमध्ये प्रथम निधी मुचंडी, द्वितीय वसुंधरा कसब, व तृतीय विभूती पाटील.
2 किमी 13 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम विहान कोरी, द्वितीय आयु अलदोरिया, तृतीय बी. साई श्री हर्षित तर मुलींमध्ये प्रथम अनन्या पत्की, द्वितीय स्वरा गावड व तृतीय अनिका बर्डे. 51 वर्षावरील पुरुषांमध्ये प्रथम रमेशकुमार बंग, द्वितीय अरुण जाधव, तृतीय मुकेश शिंदे तर महिलांमध्ये प्रथम असिता पवार. 61 वर्षावरील पुरुषांमध्ये प्रथम सिद्धाप्पा मोटे, द्वितीय सचिन मुंज, तृतीय विक्रम देशमाने तर महिलांमध्ये प्रथम गायत्री फडके.
3 किमी 15 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम आदित्य बर्गे, द्वितीय निरंजन यादव, तृतीय वारुणराज डोंगळे तर मुलींमध्ये प्रथम चित्रानी नवले, द्वितीय प्राजक्ता प्रभू, तृतीय आरोही यवतकर. 17 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम प्रसाद सायनेकर, द्वितीय मयुरेश जाधव, तृतीय सोहम शेलार तर मुलींमध्ये प्रथम श्रेष्ठा रोटी, द्वितीय जान्हवी राऊत, तृतीय जुई गावकर. 17 वर्षावरील मुलांमध्ये प्रथम स्मरण मंगलोरकर, द्वितीय धैर्यशील भोसले, तृतीय पुष्कर गवळी.
5 किमी 21 वर्षावरील मुलांमध्ये प्रथम ध्रुव देशमाने व द्वितीय ज्ञानेश आव्हाड.