क्रिकेट स्पर्धेत सारळ आदिवासी संघ विजेता

। खारेपाट । वार्ताहर ।
उद्योजक अमित नाईक पुरस्कृत जय हनुमान सारळ आदिवासी वाडी आयोजित रायगड जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेत जय हनुमान सारळ आदिवासी संघ विजेता ठरला असून, विजेता संघास आकरा हजार रूपयांचा पारोतोषिक व भव्य ट्राफी देण्यात आले. तसेच स्पर्धेत उपविजेता संघ म्हणून वेताळ वाडी सुरई संघ मुरुड व तृतीय क्रमांक वाघोली-अलिबाग या संघास ट्रॉफी व पारितोषिके देण्यात आले. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज प्रशांत नाईक सारळ तसेच उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत वाघमारे मुरुड या खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले.
सदर क्रिकेट स्पर्धा गेली तीन दिवस आद्य सप्लायर्स म्हात्रोळी सारळ या भव्य मैदानात खेळवण्यात आल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अमित नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. तर पारितोषिक वितरण सारळ ग्रामपंचायत सरपंच अमृता नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते ओमकार पाटील, रोहिदास म्हात्रे व पंच कृषीतील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत मंडळाच्या वतीने करण्यात आले.सदर स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या 30 क्रिकेट संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे समालोचन नवनाथ वाघमारे, रोहिदास म्हात्रे, महेंद्र म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version