सरिता वाघेंची उपसरपंचपदी निवड

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

ग्रुप ग्रामपंचायत माजगाव उपसरपंचपदी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरिता कमलाकर वाघे यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते संतोष बैलमारे यांनी सरिता वाघे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेऊन, पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामविकासाला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील, रमेश जाधव, अमित पाटील, मथुरा वाघे, जयेश पाटील, संतोष महाब्दी, कमलाकर वाघे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version