। सुधागड-पाली । वार्ताहर ।
जांभुळपाडा गावाजवळील टाटाचा माळ येथील गणेश माळी यांच्या हॉटेलमध्ये सशाच्या मोठ्या पिंजर्यात सोमवारी (ता.18) धामण जातीचा साप शिरला होता. या सापाला येथील सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांनी शिताफीने पकडून जीवदान दिले. हा साप पिंजर्यात सशाने खोदलेल्या बिळात लपलेला होता. सावंत यांनी हे बिळ खोदून शेपटी पकडून सापाला व्यवस्थित बाहेर काढले. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी योगेश साजेकर यांनी या सापाला जंगलात सुखरूप सोडले. मानवी वस्तीत साप आल्यास कोणीही घाबरून जाऊ नये. तसेच सापाला कोणतीही दुखापत न करता जवळच्या सर्पमित्राला बोलवावे, असे आवाहन सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांनी केले.







