सावरोली,-खारपाडा मार्ग धोकादायक

| खोपोली | वार्ताहर |
सावरोली खारपाडा राज्य मार्गावरील समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा दिल्यानंतर देखील अद्याप बांधकाम विभाग सुस्तच आहे. त्यामुळे अशा अभियंतांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करण्याची तयारी माजी पंचायत समिती उपसभापती श्याम साळवी यांनी केली आहे. सावरोली- खारपाडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो.

पातळगंगा औद्योगिक वसाहतीच्या तोंडावर बोरीवली गावाच्या वळणावर रस्त्याला खड्डे पडल्यामुळे रस्ता अतिशय धोकादायक झाला आहे .या ठिकाणी अगोदर देखील दुचाकीस्वारांचे जीव घेणे अपघात घडले आहेत. गुरुवारी देखील दुचाकीस्वाराचा अपघात घडल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अ श्याम साळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डा बुजवण्यासाठी वारंवार दूरध्वनी करून देखील बांधकाम विभाग गारठलेल्या अवस्थेत आहे. अपघाताला कारणीभूत खड्डा दोन दिवसात न बुजवल्यास सुस्त अभियंतांचा सत्कार करणार असल्याचे श्याम साळवी यांनी सांगितले.

Exit mobile version